00:00
03:27
सध्या या गाण्याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
तोळा-तोळा
♪
तोळा-तोळा
का जीव तोळा-तोळा तुझ्यासाठी झुरतो?
उगाच मागे-मागे तुझ्या भिरभिरतो
का जीव तोळा-तोळा तुझ्यासाठी झुरतो?
उगाच मागे-मागे तुझ्या भिरभिरतो
हरवूनी तुझ्यात मी पुन्हा-पुन्हा
का नाव तुझे गुणगुणतो?
का जीव तोळा-तोळा तुझ्यासाठी झुरतो?
उगाच मागे-मागे तुझ्या भिरभिरतो
♪
तुझ्या नशील्या नजरेत मी ही गुरफटते
हा, शहारते रे, मन वेडे तुझ्यातच विरते
हसता तू जरा खोल काळजात हुळहुळे
बोलणे, सांगणे सारे ओठांवर अडखळे
हरवूनी तुझ्यात मी पुन्हा-पुन्हा
का नाव तुझे गुणगुणते?
का जीव तोळा-तोळा तुझ्यासाठी झुरतो?
उगाच मागे-मागे तुझ्या भिरभिरतो
♪
तुझीच होते, जगणेही माझे मी विसरते
हा, करु नये ते सारे काही तुझ्यासाठी करते
ऐक ना एकदा, तुझे नाव माझ्या श्वासातले
नेमके सांग ना काय नाते तुझ्या-माझ्यातले?
हरवूनी तुझ्यात मी पुन्हा-पुन्हा
का नाव तुझे गुणगुणतो?
का जीव तोळा-तोळा तुझ्यासाठी झुरतो?
उगाच मागे-मागे तुझ्या भिरभिरतो
का जीव तोळा-तोळा तुझ्यासाठी झुरतो?
उगाच मागे-मागे तुझ्या भिरभिरतो