background cover of music playing
Gaav Sutana - Avadhoot Gupte

Gaav Sutana

Avadhoot Gupte

00:00

04:40

Song Introduction

सध्या या गाण्याबद्दल संबंधित माहिती उपलब्ध नाही.

Similar recommendations

Lyric

काय सांगू, राणी, मला गाव सुटं ना

कसं सांगू, राणी, मला गाव सुटं ना

काय सांगू, राणी, मला गाव सुटं ना

कसं सांगू, राणी, मला गाव सुटं ना

बंद गळ्यामंदी माझं मावं ना गं अंग

जीन्सच्या कापडामंदी दुनिया झाली कशी तंग

जो तो हाये, राणी, आपल्या धुंदीमधी दंग

माणसांनी माणसांचे सोडले का रंग?

म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटं ना

काय सांगू, राणी, मला गाव सुटं ना

काय सांगू, राणी, मला गाव सुटं ना

कसं सांगू, राणी, मला गाव सुटं ना

पारी आली, सरी गेली, झाली त्याची तारी

पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली कोरी

कॉलेज्याच्या कट्टयावरती गर्दी झाली सारी

अपऱ्या-चिपऱ्या कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी

हितं म्हातारीच्या डोईवरला पदर हटं ना

काय सांगू, राणी, मला गाव सुटं ना

काय सांगू, राणी, मला गाव सुटं ना

कसं सांगू, राणी, मला गाव सुटं ना

शहरातली गाडी बघा धूमचं गाणं गाती

भावनांनी भावनांशी तोडली का नाती?

ओल्याचिंब पावसात ओलीचिंब माती

शारदाच्या चांदण्यात भिजल्या का गं राती?

सर्जा राजाची गं जोडी माग हटं ना

काय सांगू, राणी, मला गाव सुटं ना

काय सांगू, राणी, मला गाव सुटं ना

कसं सांगू, राणी, मला गाव सुटं ना

गावाकडची माणसं आमची कशी साधी-भोळी

प्रेमाच्या या रंगामंदी रंगते आमची होळी

दिवाळीच्या सणामंदी जमली ही मंडळी

सुरसुरीच्या सुरामंदी चाखू पुरणपोळी

चुलीवरल्या भाकरीची चव ही सुटं ना

काय सांगू, राणी, मला गाव सुटं ना

हो, शहरातली पोर कशी साहेब झाली

गावाकडली पोर आता पाराखाली आली

मास्तराच्या ठेक्यावरती शाळा आमची सुटली

राम्याच्या गुत्त्यावर बाटली कशी फुटली

शांतेचं कार्ट अजून दहावी सुटं ना

काय सांगू, राणी, मला गाव सुटं ना

काय सांगू, राणी, मला गाव सुटं ना

कसं सांगू, राणी, मला गाव सुटं ना

- It's already the end -