00:00
06:36
सध्या या गाण्याच्या संदर्भातील कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी, कुठे? मन वेडे गुंतले
पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी, कुठे? मन वेडे गुंतले
पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी, कुठे? मन वेडे गुंतले
पाहिले न मी तुला...
♪
हिमवर्षावातही कांती तव पाहूनी
हिमवर्षावातही कांती तव पाहूनी
तारका नभातल्या लाजल्या मनातूनी
ओघळले हिमतुषार गालावर थांबले
ओघळले हिमतुषार गालावर थांबले
ना कळे कधी, कुठे? मन वेडे गुंतले
पाहिले न मी तुला...
♪
का उगाच झाकीशी? नयन तुझे साजणी
का उगाच झाकीशी? नयन तुझे साजणी
सांगतो गुपित गोड स्पर्श तुझा चंदनी
धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले
धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले
ना कळे कधी, कुठे? मन वेडे गुंतले
पाहिले न मी तुला...
♪
मृदूशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी
ओ, मृदूशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी
पाहिलेस तू तुला आरश्यात ज्या क्षणी
रुप देखणे बघून नयन हे सुखावले
रुप देखणे बघून नयन हे सुखावले
ना कळे कधी, कुठे? मन वेडे गुंतले
पाहिले न मी तुला, तू मला ना पहिले