00:00
06:02
निघून गेला रंग, विरून गेला धागा
व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा
निघून गेला रंग, विरून गेला धागा
व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा
तुटलेल्या काचेचं सपान हे डोळ्यात
रात पेटून उठती अन दिवस काळोखात
माझ्या देवा
(Hey-hey, कपाळी ह्या नशिबाची रेघ पाड देवा)
(तुझ्या हातानेच माझी नजर काढ देवा)
(Hey, कपाळी ह्या नशिबाची रेघ पाड देवा)
(तुझ्या हातानेच माझी नजर काढ देवा)
माझ्या देवा
♪
(आल्या-गेल्याची, नात्या-गोत्याची)
(नजर तू रं काढ, देवा)
(घरातल्याची, दारातल्याची)
(नजर तू रं काढ देवा)
♪
हो, वाचवू मी काय? सारं झालं खाक
साठवू मी काय? राख ही हातात
वेदनांची थाप, आठवांचा शाप
प्रेम का हे पाप समजेना
वचनांचा पाचोळा उरला उन्हात
भटकतो वण-वण मनातल्या मनात
माझ्या देवा
(Hey-hey, कपाळी ह्या नशिबाची रेघ पाड देवा)
(तुझ्या हातानेच माझी नजर काढ देवा)
(Hey, कपाळी ह्या नशिबाची रेघ पाड देवा)
(तुझ्या हातानेच माझी नजर काढ देवा)
माझ्या देवा
♪
पुन्हा तीच आस, पुन्हा तोच घाव
पुन्हा बघ रे मोडलं काळजाचं गाव
पुन्हा सामसुम, पुन्हा जा निघून
आणू बळ कुठून उमजेना
घेतो आता धाव पुन्हा तुझ्या उंबऱ्यात
थांबव रे तूच ही आसवांची बरसात
माझ्या देवा, देवा
(Hey-hey, कपाळी ह्या नशिबाची रेघ पाड देवा) देवा
(तुझ्या हातानेच माझी नजर काढ देवा) देवा
(Hey, कपाळी ह्या नशिबाची रेघ पाड देवा) देवा
(तुझ्या हातानेच माझी नजर काढ देवा)
माझ्या देवा