00:00
03:28
तो चांद राती तेजाळताना
हे प्राण माझे ओवाळताना
का प्रीत वेडी लाजते?
श्वासात वेणू वाजते
येतील हाती ते स्वर्ग साती
आजन्म तू साथ दे
तो चांद राती तेजाळताना
हे प्राण माझे ओवाळताना
♪
तू जरतारी, काठ रुपेरी
मोहरल्या पदराचा
व्याकूळलेल्या या धरणीला
शामलं मेघ सुखाचा
जीव उधळला आज तुझ्यावर
टाकूनिया कात रे
येतील हाती ते स्वर्ग साती
आजन्म तू साथ दे
तो चांद राती तेजाळताना
हे प्राण माझे ओवाळताना