00:00
03:54
परिकथेच्या पऱ्या होऊनी खऱ्या उतरल्या चंद्रावरुनी

खबर नवी ही जरा मला बावरा अचानक गेल्या करुनी
कुठून आले धुके, गुलाबी जादू कशी झाली अशी
इथे बघू का तिथे, नजर अडखळे, झुळूक हर जाते हसुनी
परिकथेच्या पऱ्या होऊनी खऱ्या उतरल्या चंद्रावरुनी
♪
बेभान उडतात फुलपाखरे रंगात वाहून मन बावरे

हलकी नशा रोज हाती उरे, दुनिया खरी की इशारे खरे
कळे तरी ना वळे, खुळावे काया अशी माया जशी
इथे बघू का तिथे, नजर अडखळे, झुळूक हर जाते हसुनी
परिकथेच्या पऱ्या होऊनी खऱ्या उतरल्या चंद्रावरुनी
♪
तारे-नी-वारे गुलाबी हवे, वाऱ्या सवे गंध येती नवे

बेधुंदी स्वप्नात ही जागवे, नजरेत सलगी चे लाखो दिवे
जुळे तरी ना मिळे हवेसे, वाया नको जाया आता