00:00
05:03
लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा (भवानीचा)
लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा (भवानीचा)
मी पणाचा दिमाख तुटला
अंतरंगी आवाज उठला
ऐरणीचा सवाल सुटला
या कहाणीचा
लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा (भवानीचा)
हे, लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा
♪
वीज तळपली, आग उसळली
ज्योत झळकली, आई गं
(या दिठीची काजळ काळी)
(रात सरली आई गं)
बंध विणला, भेद शिनला
भाव भिनला आई गं
(भर दुखांची आस जीवाला)
(रोज छळते आई गं)
माळ कवड्यांची घातली गं
आग डोळ्यात दाटली गं
कुंकवाचा भरून मळवट
या कपाळीला
लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा (भवानीचा)
लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा
♪
आई राजा उदो, उदो, उदो
(उदो उदो, उदो उदो, उदो उदो, उदो उदो)
तुळजापूर तुळजाभवानी आईचा
(उदो उदो)
माहूर गाडी रेणुका देवीचा
(उदो उदो, उदो उदो)
आई अंबाबाईचा
(उदो उदो)
देवी सप्तशृंगीचा
(उदो उदो)
बा सकलकला अधिपती गणपती धाव
(गोंधळाला याव)
पंढरपूर वासिनी विठाई धाव गं
(गोंधळाला यावं)
गाज भजनाची येऊ दे गं
झांज स्वीजमाची वाजु दे
पत्थरातून फुटलं टाहो
या कपटचा