00:00
05:48
गणपती माझा नाचत आला हे आनंद शिंदे यांच्या गायलेल्या लोकप्रिय मराठी भक्तीगीतांपैकी एक आहे. या गाण्याने गणपती उत्सवाच्या वेळी लाखो प्रेमींना भावपूर्ण आनंद दिला आहे. उत्सवाच्या वातावरणात नाचत साजरा करण्यासाठी हे गाणे अत्यंत योग्य आहे. आनंद शिंदे यांच्या सुरेख गायकीने आणि गाण्याच्या लयीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर देखील या गाण्याला मोठा प्रतिसाद मिळाला असून, विविध मिडीयांमध्ये या गाण्याची प्रशंसा होत आहे.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
आला रे, आला गणपती आला
आला रे, आला गणपती आला
आला रे, आला गणपती आला
पार्वतीच्या बाळा, पायात वाळा
पार्वतीच्या बाळा, तुझ्या पायात वाळा
पुष्प हारांच्या घातल्यात माळा
ताश्याचा आवाज...
ताश्याचा आवाज तरारारा झाला
रं गणपती माझा नाचत आला
ताश्याचा आवाज तरारारा झाला
रं गणपती माझा नाचत आला
(ताश्याचा आवाज तरारारा झाला)
(हो, गणपती माझा नाचत आला)
(ताश्याचा आवाज तरारारा झाला)
(हो, गणपती माझा नाचत आला)
मोदक, लाडू संगतीला घेऊ
भक्ति भावाने देवाला वाहू
गणरायाचं गुणगान गाऊ
डोळे भरुन देवाला पाहू
(देवाला पाहू, देवाला पाहू)
(देवाला पाहू, देवाला पाहू)
गाव हा सारा रंगून गेला
रं गणपती माझा नाचत आला
(ताश्याचा आवाज तरारारा झाला)
(हो, गणपती माझा नाचत आला)
(ताश्याचा आवाज तरारारा झाला)
(हो, गणपती माझा नाचत आला)
वंदन माझे तुझिया पाया
धरी शिरावर कृपेची छाया
भक्ताला या दर्शन द्याया
देवा-जी-देवा हे गणराया
(देवा-जी-देवा हे गणराया)
(देवा-जी-देवा हे गणराया)
सान, थोरा आनंद झाला
रं गणपति माझा नाचत आला
(ताश्याचा आवाज तरारारा झाला)
(हो, गणपती माझा नाचत आला)
(ताश्याचा आवाज तरारारा झाला)
(हो, गणपती माझा नाचत आला)
फटाके उड़ती चाले जयघोष
नाचाया, गाया आलाय जोश
धुंदीत झाले रे बेहोश
मोहाचे सारे तोडूनि पाश
(मोहाचे सारे तोडून पाश)
(मोहाचे सारे तोडून पाश)
मजा ही येते दरवर्षाला
रं गणपति माझा नाचत आला
(ताश्याचा आवाज तरारारा झाला)
(हो, गणपती माझा नाचत आला)
(ताश्याचा आवाज तरारारा झाला)
(हो, गणपती माझा नाचत आला)
अशी तुझी ही मंगलमूर्ती
दर्शन मात्रे पावन होती
लावुन ज्योति ओवाळू आरती
आनंदाला आज आलीया भरती
(आनंदाला आज आलीया भरती)
(आनंदाला आज आलीया भरती)
सोपान करतोय लय बोलबाला
रं गणपति माझा नाचत आला
(ताश्याचा आवाज तरारारा झाला)
(हो, गणपती माझा नाचत आला)
(ताश्याचा आवाज तरारारा झाला)
(हो, गणपती माझा नाचत आला)
पार्वतीच्या बाळा, पायात वाळा
पार्वतिच्या बाळा, तुझ्या पायात वाळा
पुष्प हारांच्या घातल्यात माळा
ताश्याचा आवाज तरारारा झाला
रं गणपती माझा नाचत आला
(ताश्याचा आवाज तरारारा झाला)
(हो, गणपती माझा नाचत आला)
(ताश्याचा आवाज तरारारा झाला)
(हो, गणपती माझा नाचत आला)
(गणपती माझा नाचत आला)
(गणपती माझा नाचत आला)
(गणपती माझा नाचत आला)
(गणपती माझा नाचत आला)
(गणपती माझा नाचत आला)
(गणपती माझा नाचत आला)