00:00
04:38
ह्यो जीव गुंतला तुझ्यामंदी
हो, तूच तू गं माझ्या मनामंदी
काही ठाव राही ना, ह्यो जीव जाई ना
म्या रंगलो गं, राणी, तुझ्या रंगामंदी
कसा सांगू? कुणा सांगू?
देवाला तुला मागू
तुझं सपान पडतंय गं
असं पहिल्यांदा घडतंय गं
मन येड्यावानी, येड्यावानी करतंय गं
ह्यो येड्यावानी प्यार तुला करतंय गं
मन येड्यावानी, येड्यावानी करतंय गं
ह्यो येड्यावानी तुझ्यावरी मरतंय गं
♪
तुझ्या इश्काचं वारं भिनलं गं अंगात
बेरंग जिंदगानी आली गं रंगात
येड्यावानी बडबडतो, तुझ्यासाठी तळमळतो
होते गं धडधड माझ्या काळजात
तू माझ्याकडं पाही, मी तुझ्याकडं पाही
तू बघून मला हसशील, मी हळूच रुसून जाईल
या काळजावर, राणी, तुझं नाव टिपून हाय
तू बोलशीन नाही, इथं जीव निघून जाई
हो, या दिलामंदी काहीतरी घडतंय रं
ह्यो येड्यावानी प्यार तुला करतंय रं
मन येड्यावानी, येड्यावानी करतंय रं
मन येड्यावानी प्यार तुला करतंय रं
येड्यावानी, येड्यावानी करतंय गं
येड्यावानी तुझ्यामागं पळतंय गं
येड्यावानी, येड्यावानी करतंय गं
येड्यावानी प्यार तुला करतंय गं
♪
लागलीया गोडी तुझी, जीवापाड ओढ तुझी
राहावं ना तुझ्याईना हवी मला जोड तुझी
सांज कि पहाट काही नाही यात, तुझ्यात न्हालोया गं
करतं बेभान तुझं गं सपान, दिवाना झालोया गं
जशी तुझी याद माझ्या या मनात घर करते
जिवापाड राणी, तुझ्याशी प्यार केलंया गं
मन येड्यावानी तुझ्यासाठी रडतंय गं
ह्यो येड्यावानी तुझ्यामागं पळतंय गं
मन येड्यावानी, येड्यावानी करतंय गं
ह्यो येड्यावानी प्यार तुला करतंय गं