00:00
03:27
हे, असं पाहिलं काहूर माजलं
जीवात जीव विरघळलं
मन झुलू लागलं, आभाळी पांगलं
सपानं डोळी सजलं
मनी ध्यानी तुझी गाणी बहरून आली रं
सनईला पैजनाचं ताल गं
आखाड्याच्या मऊ-मऊ मातीचं लेनूनी
मोत्याच्या भांगामध्ये भरलं
हे, असं पाहिलं काहूर माजलं
जीवात जीव विरघळलं
♪
लय बाय गुणाची, राजा राणीची जोडी गं
जणू दह्या, दुधाची, मधाची गोडी रं
लय बाय गुणाची, राजा राणीची जोडी गं
जणू दह्या, दुधाची, मधाची गोडी रं
तुझं येणं पुनव चांदणं
नव्हतीला येई उधानं
गाली आलं गुलाबी गोंदन
हरपूनच गेलंय भान
तुझ्या भेटी गाठीन रान सार पेटलं
तुझ्या डोळ्यामंधी सुग सर्गाचं भेटलं
सारंगी सुर नभी भिनलं
पिरतीच्या फळातं गं, धरला तू हात असा
काळीज येंधळ हरलं
हे, असं पाहिलं काहूर माजलं
जीवात जीव विरघळलं
हो, मनी ध्यानी तुझी गाणी बहरून आली रं
सनईला पैजनाचं ताल गं
आखाड्याच्या मऊ-मऊ मातीचं लेनूनी
मोत्याच्या भांगामंधी भरलं