00:00
04:42
सध्या या गाण्याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
तुला पाहता आजही, तुला पाहता आजही
हासते या मनी चांदणे, हासते या मनी चांदणे
बहरुन प्रीत ये अशी, गाली पडे खळी जशी
साथ तुझी मला हवी जीवनी
बहरुन प्रीत ये अशी, गाली पडे खळी जशी
साथ तुझी मला हवी जीवनी
♪
ओंजळीतूनी भरूनी जो आणतो सुख नवे
पाऊस तो पहिला
ओळखीतल्या वाटती बरसत्या सरी नव्या
स्पर्श तुझा होता
जरा-जरा लाजरे, तुझ्यासवे साजरे
ॠतूंचे खरे सोहळे, ॠतूंचे खरे सोहळे
बहरुन प्रीत ये अशी, गाली पडे खळी जशी
साथ तुझी मला हवी जीवनी
बहरुन प्रीत ये अशी, गाली पडे खळी जशी
साथ तुझी मला हवी जीवनी
♪
सावली तुझी भासते
मी जिथे, तु तिथे, हे बंध जन्मांचे
पापणीवरी गुंफते, माळते
रात ही, हे रंग स्वप्नांचे
हळू-हळू जोडले, हळू-हळू जोडले
मनाने मनाशी दुवे, मनाने मनाशी दुवे
बहरुन प्रीत ये अशी, गाली पडे खळी जशी
साथ तुझी मला हवी जीवनी
बहरुन प्रीत ये अशी, गाली पडे खळी जशी
साथ तुझी मला हवी जीवनी