00:00
05:05
सोनू निगम यांनी गायलेली 'मखमली' ही चित्रपट 'जिंदगी विराट' मधील एक मनमोहक गाणं आहे. या गाण्यामध्ये सुरेख लिरिक्स आणि सुरांचा अप्रतिम संगम पाहायला मिळतो. सोनू निगमांच्या भावपूर्ण आवाजामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतं आणि चित्रपटाच्या कथानकाला अधिक गाढवपणा आणतं. 'मखमली' ने संगीतप्रेमींमध्ये खास पसंती मिळवली आहे आणि त्याचे व्हिडिओ क्लिप देखील खूप पसंत केले जात आहेत.
तू पहाव, मी हराव मन होई का बावरं?
मी लपाव, तू झुराव होई अस का बर?
घडलं कधी हे समजना काही
येई कसा ओंजळी चांदवा?
मखमली, मखमली, मखमली रेशमाचा तू आस
रेशमी, रेशमी, रेशमी बंध जुळला नवा
♪
जडला जीव तुझ्या या जीवावरती, झालंय पूरतं दंग
चुकला ठोका कसा काळजाचं गं? धडधड वाढे संग
हे, सपान पहाटेचं, अधुऱ्याश्या भेटीचं
इशारा दे नजरेचा मला
हे, मोगऱ्याची दरवळं, श्वासातून घुटमळं
तुझ्यापायी झालो मी खुळा
घडलं कधी हे समजना काही
येई कसा ओंजळी चांदवा?
मखमली, मखमली, मखमली रेशमाचा तू आस
रेशमी, रेशमी, रेशमी बंध जुळला नवा
♪
जपलं सारं तुझ्या-माझ्या पिरतीत, उतरं गाली रंग
भिनलं वारं पुनवेच्या भरतीचं, चढली न्यारी झिंग
हे, तुझं रूप डोळ्यात, तुझा श्वास श्वासात
तुझा हात हातात असा
हे, उमलंल चांदनं, अंगभर गोंदुन
फुलाचा शहारा हा नवा
घडलं कधी हे समजना काही
येई कसा ओंजळी चांदवा?
मखमली, मखमली, मखमली रेशमाचा तू आस
रेशमी, रेशमी, रेशमी बंध जुळला नवा