00:00
07:16
"माझी पांढरी ची माय" हे मराठी चित्रपट 'अजिंठा' मधील एक लोकप्रिय गाणे आहे, ज्याचे गायन अजय गोगावळे यांनी केले आहे. या गाण्याचे संगीत आणि गीत मनाला स्पर्श करणारे आहे, ज्यामुळे ते प्रेक्षकांमध्ये खास लोकप्रिय झाले आहे. गाणे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे सुंदर प्रतिबिंबण करते आणि अनेकांसाठी भावनिक ओळख निर्माण करते. अजय गोगावळे यांच्या उत्तम गायकीमुळे हे गाणे अजूनही खूप आवडते आहे.
(पृथ्वीजल ब्रम्हाण्ड विठ्ठल)
(जगतासी आधार विठ्ठल)
(अवघाची साकार विठ्ठल)
(हरीनामे झंकार विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
तू बाप, तूच बंधू, तू सखा रे, तुच त्राता
रे भूतली या पाठीराखा तूच आता
अंधार यातनेचा भोवती हा दाटलेला
रे संकटी या धावूनी ये तूच आता
होऊन सावली, हाकेस धावली
तुजविन माऊली जगू कैसे?
चुकलो जरी कधी तू वाट दावली
तुजविन माऊली जगू कैसे?
(कर कटावरी ठेवुनी ठाकले विटेवर काय)
(माझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय)
(साजिरे स्वरूप सुंदर, तानभूक हरपून जाय)
(माझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय)
(ना उरली भवभयचिंता, रज, तम ही सुटले आता)
(भेदभाव कातरला रे, तनमनात झरली गाथा)
(तू कळस, तूच रे पाया, मज इतुके उमजुन जाता)
(राऊळात या देहाच्या मी तुलाच मिरवीन आता)
लोचनात त्रिभुवन अवघे लेकरास गवसुन जाय
माझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय
♪
संपू दे गां मोह मनीचा, वासना सुटावी हो
जन्म उभा चरणीची त्या वीट देवा व्हावी हो
कळस नको सोनियाचा, पायरी मिळावी हो
सावळ्या सुखात इतुकी ओंजळी भरावी हो
(भाबडा भाव अर्पिला उधळली चिंता सारी हो)
(शरण घे माय आता लागले चित्त हे तुझिया दारी हो)
विझल्या मनातली दिपमाळ चेतली
बळ आज माऊली तुझे दे
मी तुझ्यात विरता माझी राहीलीच ओळख काय
माझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय
(मी पणाच सोडून जाता या कुडीत उरले काय)
(माझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय)
(पृथ्वीजल ब्रम्हाण्ड विठ्ठल)
(जगतासी आधार विठ्ठल)
(अवघाची साकार विठ्ठल)
(भक्तीचा उद्गार विठ्ठल)
♪
अंतरी मिळे पंढरी, सावळा हरी भेटला तेथ
बोलला, "कुठे शोधीशी मला दशदिशी तुझ्या मी आत"
जाहलो धन्य ना कुणी अन्य सांगतो स्वये जगजेठी
तेजात माखले, प्राण लागले ध्यान उघडली ताटी
(ना उरली भवभयचिंता, रज, तम ही सुटले आता)
(भेदभाव कातरला रे, तनमनात झरली गाथा)
♪
Hey, मी तुझ्यात विरता माझी राहीलीच ओळख काय
माझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय
मी पणाच सोडून जाता या कुडीत उरले काय
माझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय
(माऊली, माऊली, माऊली, माऊली)
(माऊली, माऊली, माऊली, माऊली)
(माऊली, माऊली, माऊली, माऊली)
(माऊली, माऊली रुप तुझे)
माऊली (माऊली, माऊली, माऊली, माऊली)
(माऊली, माऊली रुप तुझे)