00:00
03:52
गोऱ्या-गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली
गं पोरी, नवरी आली
सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी
गं पोरी, नवरी आली
सजनी-मैत्रिणी जमल्या अंगणी
चढली तोरण मांडवदारी
किणकिण कांकन, रुनुझुनू पैंजन
सजली-नटली नवरी आली
गोऱ्या-गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली
गं पोरी, नवरी आली (गं पोरी, नवरी आली)
सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी
गं पोरी नवरी आली
♪
(ए, नवऱ्या मुलाची आली हळद ही ओली)
(हो, हळद ही ओली लावा नवरीच्या गाली)
(Hey, हळदीनं नवरीचं अंग माखवा)
(Hey, पिवळी करून तिला सासरी पाठवा)
सजनी-मैत्रिणी जमल्या अंगणी
चढली तोरण मांडवदारी
सासरच्या ओढीनं ही हासते हळूच गाली
गं पोरी, नवरी आली
सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी
गं पोरी, नवरी आली
(Hey, आला नवरदेव गे शिला, ये शिला गं)
(देव नारायण आला गं)
(मंडपात गणगोत सारं बैसल गं)
(म्होरं ढोल-ताशा वाजी रं)
(ए, सासरी मिळू दे तुला माहेराची माया)
(Hey, माहेराच्या मायेसंग सुखाची गं छाया)
(Hey, भरूनिया आलं डोळा, जड जीव झाला)
(ए, जड जीव झाला लेक जाये सासरा)
Hey, किणकिण कांकन, रुनुझुनू पैंजन
सजली-नटली नवरी आली
आनंदाच्या सरी तुझ्या बरसू दे घरी-दारी
गं पोरी, सुखाच्या सरी
सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी
गं पोरी, नवरी आली
(Hey, आला नवरदेव गे शिला, ये शिला गं)
(देव नारायण आला गं)
(मंडपात गणगोत सारं बैसल गं)
(म्होरं ढोल-ताशा वाजी रं)