00:00
04:24
सध्या या गाण्याबद्दल संबंधित माहिती उपलब्ध नाही.
कसा सांग उरातला घाव विसरावा
वनवा हा जिव्हारीचा सांग विझवावा
कशापाई जडवावा
गुंतवावा सोडवावा
कितीदा नि कुणासाठी
आसवात भिजवावा
जीव हा
सांग ना
सांग ना
कसा सांग उरातला घाव विसरावा
वनवा हा जिव्हारीचा सांग विझवावा
♪
सैरभैर झालं मन
हरपलं देह भान
उरात घाव सलतो
नाही तोल काळजाला
कसं समजावू त्याला
तुझ्यात गुरफटतो
♪
सैरभैर झालं मन
हरपलं देहभान
उरात घाव सलतो
नाही तोल काळजाला
कसं समजावू त्याला
तुझ्यात गुरफटतो
जीव हा
सांग ना
सांग ना
कसा सांग उरातला घाव विसरावा
वनवा हा जिव्हारीचा सांग विझवावा
♪
जिथं तिथं तुझी हूल
सोसवेना तुझी भूल
तुझाच भास भवती
कसं रोखू सांग मला
पापण्यांच्या सागराला
तुझ्याच पायी भरती
♪
जिथं तिथं तुझी हूल
सोसवेना तुझी भूल
तुझाच भास भवती
कसं रोखू सांग मला
पापण्यांच्या सागराला
तुझ्याच पायी भरती
जीव हा
सांग ना
सांग ना
कसा सांग उरातला घाव विसरावा
वनवा हा जिव्हारीचा सांग विझवावा