00:00
04:17
उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी
दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी
झिजू-झिजू संसाराचा गाडा हाकला
व्हटामंदी हासू जरी, कना वाकला
घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धाप रं
लई अवघड हाय, गड्या, उमगाया बाप रं
उमगाया बाप रं
लई अवघड हाय, गड्या, उमगाया बाप रं
उमगाया बाप रं
♪
मुकी-मुकी माया त्याची, मुकी घालमेल
लेकराच्या पायी उभा जल्म उधळेल
आधाराचा वड जणू वाकलं आभाळ
तेच्याइना पाचोळा जीनं रानोमाळ, जीनं रानोमाळ
घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धाप रं
लई अवघड हाय, गड्या, उमगाया बाप रं
उमगाया बाप रं
लई अवघड हाय, गड्या, उमगाया बाप रं
उमगाया बाप रं
♪
किती जरी लावलं तू आभाळाला हात
चिंता तुझी मुक्कामाला तेच्या काळजात
वाच तेच्या डोळ्यातली कधी कासाविशी
तुझ्यापायी राबनं बी हाये त्याची खुशी रं
हाये त्याची खुशी
घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धाप रं
लई अवघड हाय, गड्या, उमगाया बाप रं
उमगाया बाप रं
लई अवघड हाय, गड्या, उमगाया बाप रं
उमगाया बाप रं
(उमगाया बाप रं) उमगाया बाप रं
(उमगाया बाप रं) उमगाया बाप रं