background cover of music playing
Ambabai Gondhalala Ye - Ajay-Atul

Ambabai Gondhalala Ye

Ajay-Atul

00:00

05:38

Similar recommendations

Lyric

अगं, धाव आई, ठायी-ठायी दैत्य मातला

अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला

अगं, धाव आई, ठायी-ठायी दैत्य मातला

अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला

आता त्रिशुळ तू हातात आई घे

बळ तेच आज संबळाला दे

अन अंबाबाई गोंधळाला ये

अन अंबाबाई गोंधळाला ये

तुळजाभवानी गोंधळाला ये

अन काळुबाई गोंधळाला ये

(उदो-उदो-उदो-उदो)

(उदो-उदो-उदो-उदो)

(उदो-उदो-उदो-उदो)

(उदो-उदो-उदो)

हे सप्तशृंगवासिनी तुझा गोंधळ

(आईचा गोंधळ)

हे आई तुळजाभवानीचा गोंधळ

(आईचा गोंधळ)

अगं माहूरगडवासिनी तुझा गोंधळ

(आईचा गोंधळ)

आई करवीरवासिनी तुझा गोंधळ

(आईचा गोंधळ)

ए, वाघावर बैसूनी अंबा आली गं गोंधळाला

ए, साद ऐकून माझी अंबा आली गं गोंधळाला

ए, भक्तीचा आवाज चढविला गं साज

आज संबळ वाजं माझ्या आईच्या गोंधळाला

आता सरू दे अवस, करितो नवस, गोंधळाला ये

तुझा करितो गजर, राहू दे नजर, गोंधळाला ये

चोळी-बांगडी वाहीन, गोडवा गाईन, गोंधळाला ये

आई सुखाचा सागर, मायेचा पाझर, गोंधळाला ये

प्रलयातुनी जगा...

प्रलयातुनी जगा आई तूच तारिले

बळ तेच आज संबळाला दे

अंबाबाई गोंधळाला ये

अगं, अंबाबाई गोंधळाला ये

तुळजाभवानी गोंधळाला ये

अगं, काळुबाई गोंधळाला ये

(उदो-उदो-उदो-उदो)

(उदो-उदो-उदो-उदो)

(उदो-उदो-उदो-उदो)

(उदो-उदो-उदो)

ए, रात सरली काळी गं

(ए, उजळलं आभाळी गं)

उभी पाठीशी जगदंबा

(माझी माय लेकुरवाळी गं)

आई संकटातून तार, तुझे उघडुनी ये दार

आई गोंधळाला येना तुझा मांडला दरबार

तुझ्या दिवटीचा गं जाळ, झाला दुर्जनांचा काळ

आता तूच गं सांभाळ

आई गोंधळ मांडला, आज गोंधळाला ये

आई गोंधळाला, गोंधळाला, गोंधळाला ये

(आई गोंधळ मांडला, आज गोंधळाला ये)

(आई गोंधळाला, गोंधळाला, गोंधळाला ये)

अंगार जो तुझ्या...

अंगार जो तुझ्या नजरेत पेटला

अन तीच आग संबळाला दे

अगं, अंबाबाई गोंधळाला ये

Hey, अंबाबाई गोंधळाला ये

तुळजाभवानी गोंधळाला ये

अगं, काळुबाई गोंधळाला ये

(उदो-उदो-उदो-उदो)

(उदो-उदो-उदो-उदो)

(उदो-उदो-उदो-उदो)

(उदो-उदो-उदो)

(दुःख निवारक तू जननी, आई तू जननी)

(शरण तुला मी तंव चरणी)

(धाडी दिशांतरी संकट हे, आई संकट हे)

(सोडवी क्लेशातूनी दुर्गे)

(त्रिभुवन जाणूनी तंव महिमा, आई तंव महिमा)

(आदिशक्ती तू, तूच क्षमा)

(विजयाचा वर दे अंबे, वर दे अंबे)

(माय भवानी जगदंबे)

(माय भवानी जगदंबे)

(माय भवानी जगदंबे)

- It's already the end -