background cover of music playing
Yuge Atthavis - Ketan Patwardhan

Yuge Atthavis

Ketan Patwardhan

00:00

02:37

Similar recommendations

Lyric

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा

वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा

पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा

चरणी वाहे भीमा उद्धरी जगा

जय देव, जय देव, जय पांडुरंगा

रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा

जय देव, जय देव

(जय देव, जय देव, जय पांडुरंगा)

(रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा)

(जय देव, जय देव)

तुळशी माळा गळा कर ठेऊनी कटी

कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी

देव सुरवर नित येती भेटी

गरुड हनुमंत पुढे उभे राहती

जय देव, जय देव

(जय देव, जय देव, जय पांडुरंगा)

(रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा)

(जय देव, जय देव)

धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा

सुवर्णनाची कमळे, वनमाळा गळा

राई रखुमाबाई राणीया सकळा

ओवाळीती राजा विठोबा सावळा

जय देव, जय देव

(जय देव, जय देव, जय पांडुरंगा)

(रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा)

(जय देव, जय देव)

ओवाळू आरत्या कुरवंड्या येती

चंद्रभागे माजी सोडूनिया देती

दिंड्या, पताका वैष्णव नाचती

पंढरीचा महिमा वर्णावा किती

जय देव, जय देव

(जय देव, जय देव, जय पांडुरंगा)

(रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा)

(जय देव, जय देव)

आषाढी, कार्तिकी भक्तजन येती

चंद्रभागे माजी स्नान जे करिती

दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती

केशवासी नामदेव भावे ओवाळीती

जय देव, जय देव

(रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा)

(रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा)

(जय देव, जय देव)

- It's already the end -