00:00
05:23
भेटली तु पुन्हा का नवी भासली तू मला सांग ना?
शब्द ना बोलले, बोलके हे उसासे मुक्या भावना
का हे होते असे आज माझ्या मना?
ती तुझ्या सोबती एकटा मी पुन्हा
का असे गुंतणे ठाव नाही कुणा?
कोणता खेळ हा कोणत्या या खुणा
तु तिथे, मी इथे अंतरे ना तरी का दुरावा नवा
भेटली तु पुन्हा, पाहिले मी तुला आज माझ्याविना
♪
मी तुला पाहता का गुंग होतो असा?
तु दंग होता जरा हा छंद होई जसा
आहे तु कोणती? आहे मी कोणता?
सोबतीने तुझ्या हे कळेना मला
गुंफले का असे तुझ्यात मला?
शोधता मी मला शोध लागे तुझा
थांब ना तु जरा भान गेले कुठे शोधू दे ना मला
भेटली तु पुन्हा, भेटलो मी मला आज माझ्याविणा
♪
दूर तु जाता मना हुरहूर का आता?
ओढ लागे का? का तुझी पावलांना या?
♪
भास का तुझा हवा-हवासा या मना?
मी नव्या वाटेवरी वळणाशी तु पुन्हा
दूर होता अशी नजरेच्या जरा
शोधुनी मी तुला कावरा-बावरा
तु अशी ना इथे जाण आहे मला
गुंततो मी तरी पाहुनी का तुला?
होऊ दे भास हे शोधू ये गुंतण्याचा बहाणा नवा
भेटली तु पुन्हा, दाटली तुच तु आज माझ्या मना