00:00
04:16
रोज वाटे तू दिसावे, सोबतीने मी असावे
रोज वाटे तू दिसावे, सोबतीने मी असावे
हे अनोखे वेड आहे, ही निराळी ओढ आहे
पाहता तुला भान हरवले
मन असे कसे तुझ्यात गुंतले?
मन असे कसे तुझ्यात गुंतले?
मन असे कसे तुझ्यात गुंतले?
♪
कळे जे मला ते तुला कळावे, किती अपूर्ण मी तुझ्याविना
मिळाले हवेसे तुझे इशारे, तुझ्या जपून ठेवते खुणा
पास येता मी भुलावे, सावरू कसे मला हे ना कळे?
प्रेमवेडे हे शहारे जोडती दुवे मनामनातले
भेटता तुला भान हरवले
मन असे कसे तुझ्यात गुंतले?
मन असे कसे तुझ्यात गुंतले?
मन असे कसे तुझ्यात गुंतले?
♪
(I just wanna say "I love you")
(I just wanna say "I love you")
सुखाच्या सरीचे नवीन गाणे पुन्हा-पुन्हा हे गुणगुणायचे
सुगंधी क्षणांचे हे रंग सारे, जणू धुक्यात उलगडायचे
मी भिजावे, मी रुजावे, अंग-अंग, थेंब-थेंब हे दिसे
मी जीवाला गुंतवावे, मोहरून जायचे हे वय असे
जाणता तुला भान हरवले
मन असे कसे तुझ्यात गुंतले?
मन असे कसे तुझ्यात गुंतले?
मन असे कसे तुझ्यात गुंतले?