00:00
03:43
समदं येगळच वाटतंय
भलतं सलतच भासतंय
तु, तुझी मला वाट दे
हात, हातामंदी हात दे
आपसुख पैंजनाची साद
ह्या कानी वाजती
ग्वाड लागलं, उरी भिनलं
रूप साजरं मनी बसलं
गंध भरलं, वारं फिरलं
रूप साजरं मनी बसलं
♪
तुझ्यापुढं मन माझं हरलं
गाठ ही तुझ्याशी बांधलीया
सपनात पाहिलं डोरलं
मेहंदी हातात रंगलीया
सूर सनईचे वाजे मनामंदी या
पिरमाची बाधा ही लागली
ग्वाड लागलं, उरी भिनलं
रूप साजरं आज फुललं
गंध भरलं, वारं फिरलं
रूप साजरं मनी बसलं
♪
धाकधूक जीवाची या वाढली
डोळ्याम्होरं तु दिसता गं
जन्माचा धागा जोडणा तु
जागा तुझी माझ्या काळजात
लागीरं कशानं नव झालं आता?
पिरमाची बाधा ही लागली
ग्वाड लागलं, उरी भिनलं
रूप साजरं मनी बसलं
गंध भरलं, वारं फिरलं
रूप साजरं मनी बसलं