00:00
04:29
"जगणा हे नयरा झालाजी" हे "हिर्कणी" चित्रपटाचे एक लोकप्रिय गाणे आहे. अमितराज यांनी या गाण्याचे संगीत दिले असून, उत्कृष्ट गायकीने आणि भावनिक लिरिक्सने प्रेक्षकांमध्ये खास स्थान मिळवले आहे. या गाण्याने चित्रपटाच्या कथानकाला अधिक गहनता आणि सौंदर्य प्राप्त केले आहे. संगीतप्रेमी आणि चित्रपट रसिकांमध्ये हे गाणे विशेष पसंतीचे आहे आणि त्यामुळे चित्रपटाची लोकप्रियता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
आभाळासंग मातीचं नांदनं
जीव झाला चकवा चांदणं
आभाळासंग मातीचं नांदनं
जीव झाला चकवा चांदणं
दिवसाचं दिसत्यात तारं या नभामंदी
दिवसाचं दिसत्यात तारं या नभामंदी
हो, जगणं हे न्यारं झालं जी
हा, जगणं हे न्यारं झालं जी
Hmm, जगणं हे न्यारं झालं जी
जगणं न्यारं झालं जी
♪
हात ह्यो हातात, सूर ह्यो श्वासात
पाखरांच्या ध्यासात, चिमुकल्या घासात
भरून हे डोळं आलं, डोळ्यामंदी सपान झालं
भरून हे डोळं आलं, डोळ्यामंदी सपान झालं
तुझ्यामुळं लाभलं रं सारं या जगामंदी
जगणं हे न्यारं झालं जी
हा, जगणं हे न्यारं झालं जी
Hmm, जगणं हे न्यारं झालं जी
जगणं हे न्यारं झालं जी
♪
हसून घे गालात, सनईच्या गं तालात
तुझ्या-माझ्या सलगीला, पिरतीच्या या हलगीला
लाभल्यात बाळराजं संसाराच्या शिलकीला
देव आला धावूनिया नशिबाच्या दिंमतीला
आनंदाचं गाणं आज दाटलं उरामंदी
जगणं हे न्यारं झालं जी
हा, जगणं हे न्यारं झालं जी
Hmm, जगणं हे न्यारं झालं जी
जगणं न्यारं झालं जी